Wednesday, October 1, 2014

टीबी हॉस्पिटलमध्ये जीनएक्स प्रयोगशाळा

२६ नोव्हेंबर २०१३
मुंबईत क्षयरोगाचा म्हणजे एमडीआर टीबीचा प्रार्दुभाव वाढतोय... त्यामुळे मुंबई महापालिकेनं शिवडीच्या क्षयरोग रूग्णालयात जीनएक्स प्रयोगशाळा सुरू केलीय. टीबी रूग्णांसाठी जीनएक्स प्रयोगशाळेसह अत्याधुनिक १५० खाटा याठिकाणी नव्यानं सुरू करण्यात आल्यात.
..............

व्हिओ १ -
टीबीचा धोका वाढतोय... मुंबईत २०१२ मध्ये ९१७ एमडीआर टीबीचे रूग्ण आढळले होते, तर २०१३ मध्ये एमडीआर टीबी रूग्णांची संख्या 5 हजारांच्या घरात पोहोचली. आतापर्यंत ७३ जणाचा एमडीआर टीबीमुळे मृत्यू झालाय.
GFX IN
एमडीआर म्हणजे मल्टी ड्रग रेसिस्टंट टीबी... क्षयरोगावरील प्रथम दर्जाच्या उपचारांना दाद न देणारे विषाणू वाढत असून, त्यामुळे एमडीआर टीबीचा धोका वाढलाय. अनेकदा रूग्ण टीबीवरील उपचार मध्येच थांबवतात. त्यामुळे शरीरातील प्रतिजैविकांची मात्रा कमी होते. त्यामुळे टीबीचे विषाणू 100 टक्के नष्ट होत नाही आणि एमडीआर टीबी प्राणघातक ठरतो...
GFX OUT


व्हिओ 2 -
हा धोका कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेनं शिवडीच्या क्षयरोग रूग्णालयात जीनएक्स प्रयोगशाळा सुरू केलीयं. त्याशिवाय अत्याधुनिक १५० खाटा नव्याने सुरू करण्यात आल्यात.

बाईट - सुनील प्रभू ,महापौर मुंबई

व्हिओ 3 -
पालिकेनं क्षयरोग रूग्णालयाचा  विस्तार केलाय. रूग्णालयात अत्याधुनिक सुविधांसह राज्य क्षयरोग औषध भांडार निर्माण करण्यात आलयं. हे एमडीआर टीबीचे रूग्ण गोंवडी आणि धारावीमध्ये मोठ्या प्रमाणात आढळल्यानं पालिकेनं तिथल्या स्थानिक रूग्णालयातही जीनएक्स प्रयोगशाळा त्वरीत सुरू करण्याचा निर्णय घेतलाय......


No comments:

Post a Comment