Wednesday, October 1, 2014

काँग्रेसच्या जखमेवर पवारांनी चोळले मीठ

९ डिसेंबर २०१३
चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालामुळे काँग्रेसची हाताची घडी विस्कटली असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र काँग्रेसच्या जखमांवर फुंकर घालण्याऐवजी खास पवार शैलीत मीठ चोळण्याचं काम केलंय... जनतेला दुबळे राज्यकर्ते आवडत नाहीत, ही त्यांची टीका जिव्हारी लागली असली तरी तूर्तास पवारांवर पलटवार न करण्याचा शहाणपणा राज्यातील काँग्रेस नेतृत्वानं दाखवलाय...
..................

व्हिओ -
विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसची पार धूळधाण झाली असताना, यूपीएचा घटक पक्ष असलेल्या शरद पवारांनी काँग्रेस नेतृत्वावर टीकास्त्र सोडण्याचं अचूक टायमिंग साधलंय... गेली 14 वर्षे काँग्रेससोबत संसार करणा-या राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी ब्लॉग लिहून आपल्या खास बोच-या आणि उपरोधिक शैलीत काँग्रेसला चिमटा काढलाय..
GFX IN
जनतेला दुबळे राज्यकर्ते आवडत नाहीत, खंबीर नेतृत्व लागते. राज्यकर्ता हा खंबीर आणि प्रभावी उपाययोजना करणारा, निर्णयाची खंबीरपणे अंमलबजावणी करणारा असला पाहिजे, असा भीमटोला पवारांनी ब्लॉगमध्ये लगावलाय...
GFX OUT
पवारांच्या या परखड टीकेचा रोख स्पष्टपणे काँग्रेस नेतृत्वावर असला तरी, त्यांचं टार्गेट नेमकं कोण होतं, हे समजत नाहीत... देशाचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, युवराज राहुल गांधी की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पवारांच्या रडारवर आहेत, हे नेमकं कळत नाहीय... आणि तीच खरी पवारांची खुबी आहे... एकाच दगडात चार-चार पक्षी मारण्याची किमया पवारांनी अचूक साधलीय...

बाईट - जितेंद्र आव्हाड, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

व्हीओ 2 - पवारांच्या या ब्लॉगवर काँग्रेसने थेट टीका करण्याचं टाळलंय... आधीच चार राज्यांमध्ये फटका बसलेल्या काँग्रेसचे किती खच्चीकरण झालेय, हे त्यावरून कळते...

(बाईट - माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस)

व्हिओ - या ब्लॉगच्या निमित्ताने काँग्रेससह शरद पवारांवर टीका करण्याची आयती संधी विरोधकांना मिळालीय...

(बाईट - देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष, भाजप)

व्हीओ 3 - लोकसभेची सेमीफायनल समजल्या जाणा-या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. अशावेळी मित्र पक्षांकडून सहानुभूतीची अपेक्षा असताना, जखमेवर मीठ चोळण्याचे काम पवारांसारखे मित्रपक्ष करत आहेत..

No comments:

Post a Comment