Wednesday, October 1, 2014

आम आदमी पार्टीला अखेर अण्णांची आठवण

१२ डिसेंबर २०१३
तब्बल तीन दिवसानंतर अखेर आम आदमी पार्टीला अण्णा हजारेंची आठवण झालीय... अरविंद केजरीवाल हे स्वतः तापाने फणफणत असल्याने उपोषणाला बसलेल्या अण्णांच्या भेटीसाठी आले नाहीत. परंतु आम आदमी पार्टीच्या वतीने तिघा नेत्यांनी आज राळेगणमध्ये अण्णांची भेट घेऊन आपला पाठिंबा जाहीर केला...
................

(केजरीवाल यांच्या कालच्या सभेतील बाइटने पॅकेजची सुरूवात करावी.. अण्णांना भेटायला जाणार...)

व्हिओ - अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील सेलिब्रेशनच्या माहौलमध्ये ही घोषणा केली... जनलोकपाल कायद्यासाठी अण्णा आमरण उपोषणाला बसले असताना, अरविंद केजरीवाल दिल्लीमध्ये विजयाचं सेलिब्रेशन करत होतं. त्यावरून मोठी टीका झाल्यानंतर, अण्णांच्या भेटीला जात असल्याची घोषणा त्यांना करावी लागली... परंतु रात्रीच्या रात्रीत त्यांची तब्येत अचानक बिघडली. केजरीवालांना फणफणून ताप आल्यानं ते अण्णांच्या भेटीचं आश्वासन पाळू शकले नाहीत...

(बाइट - कुमार विश्वास, केजरीवालांना ताप आलाय, अशा आशयाचा)

व्हिओ -
केजरीवाल स्वतः आले नाहीत, मात्र आम आदमी पार्टीच्या वतीने कुमार विश्वास, संजय सिंग व गोपाळ राय यांना त्यांनी राळेगणला पाठवून दिलं.. कुमार विश्वास व त्यांच्या सहका-यांनी राळेगणमध्ये येऊन अण्णांवर स्तुतीसुमनं उधळली...

(बाइट - कुमार विश्वास, अण्णा आमच्या हृदयात आहेत, आंदोलनाला पाठिंबा अशा आशयाचा)

व्हिओ -
एवढंच नव्हे तर कुमार विश्वास यांनी अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांची फोनवरून बातचीतही घडवून आणली.

(बाइट - कुमार विश्वास, अण्णा आणि केजरीवाल यांच्यात बातचीत झाल्याबाबतचा)

व्हिओ -
जलसंपदा खात्यातला भ्रष्टाचार बाहेर काढणारे निवृत्त मुख्य अभियंता व आम आदमी पार्टीचे नेते विजय पांढरे, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनीही अण्णांची भेट घेतली. लोकपाल न आणणं ही सर्वच पक्षांसाठी आत्महत्या ठरेल असं त्या म्हणाल्या.
(बाइट - मेधा पाटकर, सामाजिक कार्यकर्त्या)

व्हिओ -
मुंबईतल्या डबेवाल्यांनीही अण्णांच्या उपोषणाला पाठिंबा जाहीर केलाय. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या अण्णांचं वजन दीड किलोनं घटलंय... अण्णांचं वजन घटलं असलं तरी आंदोलन पुन्हा एकदा जोर धरू लागलंय... पुढच्या काही दिवसांत हे राळेगणमधल्या आंदोलनाचे हादरे दिल्लीतील संसदेत जाणवू लागले, तर आश्चर्य वाटायला नको...


जादूटोणा विरोधी विधेयकावरून रणकंदन

१२ डिसेंबर २०१३
जादूटोणा विरोधी विधेयकावरून हिवाळी अधिवेशनात रणकंदन सुरूय... या विधेयकातील बारा गुन्ह्यांबाबत याआधीच भारतीय दंड विधान संहितेत कडक शिक्षांची तरतूद आहे... विशेष म्हणजे विधेयकात केवळ 7 वर्षांची शिक्षेची तरतूद केली जात असल्याने असा मिळमिळीत कायदा काय कामाचा असा सवालही उपस्थित केला जातोय.
................

v.o.1 -
मानवत येथील नरबळी कांड... या हत्याकांडानंतर अंधश्रद्धा आणि अघोरी विद्यांच्या कर्मकांडाबद्दल जोरदार वादळ उठले. याप्रकरणी भारतीय दंड विधान संहितेप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आणि चार जणांना फाशीची शिक्षा देखील झाली. असे असताना आता नवीन जादूटोणा विरोधी विधेयकात अशा गंभीर गुन्ह्यांबद्दल जास्तीत जास्त केवळ 7 वर्षांची शिक्षा प्रस्तावित करण्यात आलीय.

GFX IN
भूत उतरवण्याच्या बहाण्याने एखाद्याला मारहाण करणे, मिरचीची धुरी देणे, एखाद्याच्या शरीरावर तापलेल्या वस्तूचे चटके देणे, जबरदस्तीने तोंडात मूत्र किंवा विष्टा टाकणे, चमत्कारांचे प्रयोग करून लोकांना फसवणे, कुत्रा, साप, विंचू चावल्यास वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून मंत्रतंत्र, गंडेदोरे असे उपचार करणे, कुणाचा तरी दैवी अवतार असल्याचे सांगून दुस-याच्या पत्नीशी लैंगिक संबंध ठेवणे अशा सर्व गुन्ह्यांसाठी भादंविच्या कलमांमध्ये कठोर शिक्षा सुचवण्यात आलीय..
GFX OUT

मग या नव्या कायद्याची गरज काय, असा सवाल केला जातोय. त्यावरूनच या विधेयकाला शिवसेनेचा विरोध आहे...

byte 1 सुभाष देसाई, विधीमंडळ  गटनेते

व्हिओ -
नव्या कायद्याचा दुरूपयोग होण्याची भीती व्यक्त केली जातेय. नारळ  फोडणे ही सुद्धा एक बळी देण्याची प्रतिकात्मक प्रथा असल्याची नोंद शासनाच्या कागदपत्रात आहे. जादूटोणा विरोधी विधेयक सर्वप्रथम माजी समाजकल्याणमंत्री बबनराव घोलप यांनी मांडले होते. या विधेयकात अंतर्भूत केलेले अनेक प्रकार विद्यापीठांमध्ये  शिकविले जात असतील तर कायद्याची अंमलबजावणी कशी होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

byte2 बनबराव  घोलपमाजी समाजकल्याण मंत्री 

v.o.3  सती प्रथा आणि मुरळी प्रथा प्रतिबंधक कायदाही अशाच पद्धतीने घाईघाईत मंजूर करण्यात आला. मात्र  आजपर्यंत या कायद्यांतर्गत एकही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे जादूटोणा विरोधी विधेयक चिकित्सा समितीकडे पाठवावे, अशी मागणी विरोधी पक्षांनी लावून धरलीय... अशा परिस्थितीत जादूटोणा विरोधी कायद्याचे 'भविष्य' काय? हा कायदा हिवाळी अधिवेशनात मंजूर होऊ शकेल का? असे प्रश्न उपस्थित होतायत...


अण्णांच्या आंदोलनाला 'आप'चा ताप

१२ डिसेंबर २०१३
अण्णा हजारेंच्या आंदोलनाला 'आप'चा ताप झालाय... आपच्या नेत्यांनी राळेगणमध्ये येऊन, नव्या टीम अण्णामध्ये सरकारी दलाल सहभागी असल्याची आरोपांची राळ उठवली... त्यामुळं नवी टीम अण्णा अस्वस्थ झालीय. त्यातच विश्वंभर चौधरी यांनी राळेगण सोडल्याने वातावरण आणखी तापलंय....
.....................

व्हिओ -
जनलोकपालसाठी अण्णा हजारेंनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाचा तिसरा दिवस विविध नाट्यमय घडामोडींमुळे गाजला... अण्णांना पाठिंबा देण्यासाठी आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल ताप असल्याने राळेगणला येऊ शकले नाहीत.. परंतु त्यांनी पाठवलेल्या कुमार विश्वास आणि अन्य दोघा 'आप'च्या सहका-यांनी जी काही वक्तव्ये केली, त्यामुळे अण्णा हजारेंनाच नवा ताप झालाय... आपच्या नेत्यांनी अण्णांची भेट घेऊन त्यांच्या उपस्थितीतच नव्या टीम अण्णा सदस्यांवर नाव न घेता, गंभीर आरोप केले... अण्णांच्या आंदोलनात पत्रकार रूपाने 'सरकारी दलाल' सहभागी झाले असल्याचा खळबळजनक आरोप कुमार विश्वास यांनी केला... त्यांचा स्पष्ट रोख अण्णांचे नवे सहकारी संतोष भारती यांच्यावर होता...

(बाइट - कुमार विश्वास, नेते, आप)

व्हिओ -
कुमार विश्वास यांच्या या भडिमारामुळे नवी टीम अण्णा अस्वस्थ झालीय... त्यांच्या या आरोपाचा संतोष भारती यांनीही परखड शब्दांत समाचार घेतला.

(बाइट - संतोष भारती, अण्णांचे नवे सहकारी)

व्हिओ -
दरम्यान, आपल्या आंदोलनात सरकारी दलाल सहभागी झाल्याच्या आरोपांचे अण्णांनीच खंडन केलंय...

(बाइट - अण्णा हजारे, सामाजिक कार्यकर्ते)

व्हिओ -
त्यातच उपोषणाला बसू नका, असा सल्ला अण्णांनी दिला असतानाही, आपचे नेते गोपाळ राय यांनी उपोषण सुरू करण्याचा पवित्रा घेतलाय...

(बाइट - गोपाळ राय, नेते, आप)

व्हिओ -
या घडामोडींमुळे टीम अण्णामध्ये अस्वस्थता पसरलीय... अण्णा उपोषणाला बसलेले असताना, दिल्लीमध्ये सेलिब्रेशन करणा-या आपसारख्या राजकीय नेत्यांना राळेगणमध्ये थारा देऊ नये, अशी भूमिका अण्णांच्या सहका-यांनी घेतली होती. परंतु तरीही कुमार विश्वास यांनी आंदोलनात भाषणबाजी करण्याची संधी देण्यात आल्याने अण्णांचे सहकारी विश्वंभर चौधरी नाराज झालेत. त्यातच राळेगण सोडून ते निघून गेल्याने नानाविध चर्चांना ऊत आलाय...

(बाइट - विश्वंभर चौधरी, फोनो वापरणे)

व्हिओ -
या सगळ्या नाट्यमय घडामोडी लक्षात घेता हे आंदोलन नेमकं कोणाचं? आंदोलन नेमकं कशासाठी? या उपोषणातून काय साधलं जाणार? असे सवाल निर्माण झालेत. अण्णा राहिले एका बाजूला, जुनी टीम विरूद्ध नवी टीम यांच्यात या भीष्म पितामहाला स्वतःकडे खेचण्यासाठी राळेगणच्या भूमीवर महाभारत सुरू झालंय... त्यात अण्णांची तब्येत आणखीय खालावतेय...


अण्णांचे आंदोलन आणि अरविंद केजरीवाल

११ डिसेंबर २०१३
(अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांच्या एकत्र शॉट्सने पॅकेजची सुरूवात करावी...)
व्हिओ -
भ्रष्टाचाराच्या विरोधात दोन वर्षांपूर्वी अण्णा हजारेंनी केलेल्या आंदोलनाने सारा देश ढवळून निघाला... राजधानी दिल्लीतील सत्ताधारी हादरून गेले, या अभूतपूर्व, ऐतिहासिक आंदोलनाने तरूणाईला नवी दिशा दिली... जनलोकपाल कायद्यासाठी सुरू केलेल्या या लढाईत अण्णा हजारे हिरो होते, तर अरविंद केजरीवाल हे या आंदोलनाचा मास्टरमाईंड होते...
परंतु आता गेल्या दोन वर्षांत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय... जनलोकपाल आंदोलनाच्या निमित्तानं अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांची झालेली युती आता तुटलीय... आम आदमी पार्टी या राजकीय पक्षाची स्थापना करण्यावरून अण्णा आणि केजरीवाल यांच्यात मतभेद निर्माण झालेत.. अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या जीवावर आम आदमी पार्टीला दिल्लीतील निवडणुकीत जोरदार यश मिळाले, पहिल्याच फटक्यात आपचे 28 आमदार निवडून आले.. या यशाची हवा आता बहुतेक केजरीवाल आणि कंपनीच्या डोक्यात गेलीय...
कारण जनलोकपाल विधेयक संसदेत संमत करण्याचं पंतप्रधानांचं आश्वासन अजून कागदावरच आहे... त्यामुळं जनलोकपाल कायद्यासाठी अण्णांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय... राळेगणसिद्धीमध्ये त्यांनी करो या मरोचा निर्धार करत, बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केलंय... अण्णांची वन मॅन आर्मी लढा देतेय... एकीकडे अण्णा प्राणांची बाजी लावली असताना, दुसरीकडे आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी त्यांना साधा फोनही केलेला नाही.
(बाइट - अण्णा हजारे)
केजरीवालांनी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी अण्णा हजारेंचा वापर केला... अण्णांना शहीद करण्याचा केजरीवालांचा डाव होता, असा सनसनाटी गौप्यस्फोट मध्यंतरी स्वामी अग्निवेश यांनी केला होता...
(बाइट - स्वामी अग्निवेश)
स्वामी अग्निवेश यांचा आरोप खरा होता की काय, अशी शंका आता येऊ लागलीय... कारण एकीकडे अण्णांनी प्राणांची बाजी लावली असताना, केजरीवाल आणि कंपनी मात्र विजयाच्या सेलिब्रेशनमध्ये मश्गूल आहेत. दिल्लीतील विजयानंतर केजरीवालांच्या डोक्यात हवा गेलेली दिसतेय... म्हणूनच तर उपोषण सुरू असतानाही, जल्लोष आणि सेलिब्रेशन करण्याचा मोह केजरीवालांना टाळता आलेला नाही...
अण्णांचा वापर करून मोठे झालेल्या केजरीवालांना आता आपल्या गुरूचा चक्क विसर पडलाय... त्यामुळेच तर 'गरज सरो आणि वैद्य मरो' या म्हणीची प्रकर्षाने आठवण येतेय...


जनलोकपालसाठी अण्णा हजारेंचे उपोषण

११ डिसेंबर २०१३
जनलोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीमध्ये आमरण उपोषण सुरू केलंय... मात्र या आंदोलनात सहभागी व्हायचं सोडून, अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पार्टीचे नेते सेलिब्रेशनमध्ये गुंग झाले होते... झी मीडियाने त्यांचे वाभाडे काढल्यानंतर आता केजरीवाल यांना जाग आलीय... अण्णांच्या भेटीसाठी ते आता राळेगणला जाणार आहेत...
.............

व्हिओ -
दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीचे 28 आमदार निवडून आल्यानं अरविंद केजरीवाल यांच्या डोक्यात बहुधा हवा गेलीय... इतकी की, जनलोकपाल विधेयकासाठी अण्णांनी राळेगणमध्ये उपोषण आंदोलन सुरू केलं असताना, केजरीवाल आणि कंपनी मात्र दिल्लीमध्ये सेलिब्रेशनच्या मूडमध्ये होती... अण्णांना पाठिंबा देणं राहिलं बाजूला, विजयाच्या उन्मादात केजरीवाल आणि आपचे नेते आपल्या गुरूलाच साफ विसरले.. विजयानंतर केजरीवालांनी आपले गुरू अण्णा हजारे यांना साधा फोनही केला नाही..

(बाइट - अण्णा हजारे - केजरीवालांचा फोनही आला नाही...)

व्हिओ -
भ्रष्टाचाराच्या विरोधात दोन वर्षांपूर्वी अण्णा हजारेंनी केलेल्या आंदोलनामुळे अवघा देश ढवळून निघाला... राजधानी दिल्लीतील सत्ताधारीही हादरून गेले. या लढ्याचे हिरो होते अण्णा हजारे, तर मास्टरमाईंड होते अरविंद केजरीवाल... अण्णांच्या त्याच आंदोलनाच्या जोरावर केजरीवाल यांनी स्वतःची पोळी भाजून घेतली. आम आदमी पार्टीचे 28 आमदार दिल्लीत विजयी झाले. परंतु ज्या गुरूमुळे हे यश मिळाले, त्याच गुरूला केजरीवाल विसरले... 'झी मीडिया'नं याबाबत विशेष कार्यक्रम सादर करून केजरीवालांच्या डोक्यात कशी हवा गेलीय, हे दाखवलं... राळेगणमध्ये अण्णा एकाकी झुंज देत असताना, केजरीवाल दिल्लीत सेलिब्रेशन करत असल्याचं वृत्त आम्ही सातत्यानं दाखवलं..

(बाइट - उदय सरांच्या चंकमधील बाइट व शॉट्स)

व्हिओ -
'झी मीडिया'च्या या दणक्यानंतर अखेर आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांना जाग आली. अण्णांना भेटण्यासाठी आपण राळेगणला जाणार असल्याचं केजरीवालांनी जाहीर केलंय. मात्र व्यासपीठावर न बसता, आपण लोकांमध्ये बसणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलंय...

(बाइट - अरविंद केजरीवाल - राळेगणला जाणार, या आशयाचा)

व्हिओ -
केजरीवालांना उशिरा का होईना, आता उपरती झालीय... केजरीवाल देर आए, दुरूस्त आए... परंतु केजरीवालांचेही पाय मातीचेच असल्याचं स्पष्ट झालंय... कारण बुंद से गयी, वो हौद से नही...


समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता

१० डिसेंबर २०१३
समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय दिल्ली हायकोर्टानं दिला होता... त्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं... त्याबाबत आता अंतिम फैसला येणार असून, समलैंगिक संबंधांना सुप्रीम कोर्टही शिक्कामोर्तब करणार का, याकडं सगळ्यांच्या नजरा लागल्यात...

व्हिओ -
प्रौढ व्यक्ती सहसंमतीने समलैंगिक संबंध ठेवू शकतात.. आणि असे संबंध ठेवणे कायदेशीर आहे, असा ऐतिहासिक निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आणि एकच खळबळ उडाली... आतापर्यंत अनैतिक आणि बेकायदेशीर समजल्या जाणा-या समलिंगी संबंधांना थेट कायदेशीर मान्यताच कोर्टाने दिली...

अनेक वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर हा महत्त्वपूर्ण निकाल लागला होता...
GFX IN
भारतीय दंड संहितेच्या कलम ३७७नुसार सहसंमतीचे समलैंगिक संबंध हा देखील फौजदारी गुन्हा मानला जातो. परंतु या कलमाच्या विरोधात नाझ फाऊंडेशनने 2001 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावेळी कलम 377ची पाठराखण करताना, समलिंगी संबंध हा फौजदारी गुन्हाच असल्याचं प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारच्या वतीनं 2003 मध्ये देण्यात आलं. 2 सप्टेंबर 2004 रोजी दिल्ली उच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावल्यानंतर नाझ फाऊंडेशननं सुप्रीम कोर्टात धाव घेतली. 2006 मध्ये सुप्रीम कोर्टानं हे प्रकरण पुन्हा दिल्ली हायकोर्टाकडं पाठवलं... आणि 2 जुलै 2009 रोजी दिल्ली हायकोर्टानं ऐतिहासिक निकाल दिला.. समलिंगी संबंध हा फौजदारी गुन्हा ठरवणारी कायद्यातील तरतूद मुलभूत हक्कांवर गदा आणणारी आहे. 18 वर्षांवरील प्रौढ व्यक्ती परस्पर संमतीनं समलिंगी संबंध ठेवू शकतात आणि ते कायदेशीर असतील, असा निकाल दिल्ली कोर्टानं दिला...मात्र त्याचवेळी संमतीशिवाय आणि अल्पवयीन मुलामुलींवर लादण्यात येणारे लैंगिक संबंध मात्र गुन्हाच असतील, असंही कोर्टानं स्पष्ट केलं.
GFX OUT

व्हिओ -
दिल्ली कोर्टाच्या या निर्णयाविरोधात सुरेश कुमार कौशल यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. या आशयाच्या आणखी 15 याचिका दाखल करण्यात आल्या.. या याचिकांवरील सुनावणीच्या वेळी केंद्र सरकारनं आपली भूमिक बदलली आणि दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला विरोध नसल्याचं स्पष्ट केलं. न्यायमूर्ती जी. एस. सिंघवी आणि न्यायमूर्ती एस. जे. मुखोपाध्याय यांच्या खंडपीठाकडे या खटल्याची सुनावणी झाली. 27 मार्च २०१२ रोजी खंडपीठानं याप्रकरणी आपला निर्णय राखून ठेवला.. आता त्याचा अंतिम निकाल लागणार आहे. सुप्रीम कोर्ट समलिंगी संबंधांना कायदेशीर मान्यता देणार का, याकडे आता सगळ्यांचच लक्ष लागलंय...

बिर्ला क्रीडा केंद्र ठक्कर कॅटरर्सला आंदण

१० डिसेंबर २०१३
गिरगाव चौपाटीवरील मुंबई महापालिकेचं बिर्ला क्रीडा केंद्र आता ओळखलं जातंय ते ठक्कर्स कॅटरर्सच्या नावानं. मार्केट रेटच्या तुलनेत अगदीच तुटपुंज्या भाड्यावर बीएमसीनं हे केंद्र जणू ठक्कर्स कॅटरर्सला आंदण दिलंय... 10 वर्षांचा भाडेकरार संपून एक वर्ष झालं असलं तरी बीएमसीनं साधी नोटीस पाठवण्याचीही तसदी घेतलेली नाही.

व्हीओ.1-
बिर्ला क्रीडा केंद्राच्या इमारतीबाहेर बीएमसीचं आणि बिर्लांचं नाव दिसत असलं तरी आतला सर्व कारभार मात्र ठक्कर्स कॅटरर्सच्या हातात आहे. क्रीडा क्रेंद्राची ओळख कधीच संपली असून आतमध्ये चालतात केवळ उच्चभ्रूंच्या पार्ट्या आणि लग्नसमारंभ.... मुंबई महापालिकेच्या कृपेनं हे सारं आलबेल सुरु आहे. बंद अवस्थेत असलेल्या बिर्ला क्रीडा केंद्राचं कॅन्टीन बीएमसीनं ठक्कर्स कॅटरर्सला दहा वर्षांच्या करारावर भाड्यानं दिलं. या करारातील सर्व तरतुदी ठक्कर्सला फायदेशीर अशाच आहेत.
GFX IN...
7049 स्क्वेअर फूट क्षेत्रफळ असणारं कॅन्टीन दरमहा 1 लाख 80 हजार रुपये भाडेतत्वावर देण्यात आलं. म्हणजे केवळ 25 रुपये प्रति स्क्वेअर फूट दर. गेल्या वर्षभरापासून 62 रुपये प्रति स्क्वेअर फूट दर आकारला जात असला तरी गिरगाव भागात मार्केट रेट आहे सरासरी 250 रुपये प्रति स्क्वेअर फूट... मार्केट रेटनुसार भाडे आकारल्यास दरमहा 17 लाख 50 हजार रुपये बीएमसी तिजोरीत जमा होऊ शकतात.
GFX OUT
परंतु बीएमसी अशा फायद्याच्या गोष्टी करणार नाही. सुमारे 21 हजार स्क्वेअर फुटांचा लॉनही ठक्कर्स कॅटरर्स आपल्या गरजेनुसार वापरतो. म्हणजे सात तासांसाठी तो बीएमसीला देतो केवळ वीस हजार रुपये. तर ठक्कर्स त्याच लॉनसाठी ग्राहकांकडून वसूल करतो 2 ते 3 लाख रुपये.. दहा वर्षांचा करार संपल्यानंतरही पुढील काळासाठी ही जागा ठक्कर्सकडेच कशी राहिल याचीही तरतूद या करारात करण्यात आलीय.     

बाईट - चेतन मदन, कार्यकर्ता मनसे

व्हीओ.2 - जनतेला दाखवण्यासाठी बिर्ला क्रीडा केंद्र दुरुस्तीच्या नावाखाली तेरा वर्षांपासून बंद ठेवण्यात आलंय... परंतु ठक्कर्स कॅटरर्सला वापरासाठी मात्र ते खुलं आहे. सत्ताधारी आणि अधिका-यांशी असलेल्या अर्थपूर्ण संबंधामुळेच ठक्कर्सवर एवढी मेहेरबानी केली जात असल्याचा आरोप मनसेनं केलाय.

बाईट - अरविंद गावडे, विभागप्रमुख, मनसे       
      - सुरेंद्र बागलकर, नगरसेवक, शिवसेना

व्हीओ.3-  ठक्कर्स कॅटरर्सला पार्ट्या करण्यासाठी आणि रेस्टॉरंट चालवण्यासाठी बिर्ला कुटुंबियांनी ही जागा बीएमसीला दिली नव्हती. तर नाट्य संस्कृती वाढीसाठी दिली होती. याची आठवण मुंबई महापालिकेत सत्ता गाजवणा-या शिवसेनेला कधी येणार?