२७ नोव्हेंबर २०१३
ऊसदराच्या
मुद्यावरून स्वाभिमानी शेतकरी
संघटनेनं सुरू केलेलं आंदोलन
आता चांगलंच पेटलंय...
कराड आणि सांगलीमध्ये
आंदोलकांनी गाड्यांची तोडफोड
आणि जाळपोळ सुरू केलीय.
त्यातच गुरूवारी
सकाळपासून 48
तासांचा कडकडीत
बंद पुकारण्याची घोषणा संघटनेचे
नेते खा. राजू
शेट्टी यांनी केलीय....
....................
(जाळपोळीच्या
शॉटनी पॅकेजची सुरूवात करावी...)
व्हिओ -
मुंडण...
दगडफेक...
तोडफोड...
जाळपोळ...
ऊसाला पहिली उचल
3000 रूपये
द्यावी, या
मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी
संघटनेनं सुरू केलेलं आंदोलन
आणखी उग्र बनलंय...
सांगली आणि कोल्हापूर
जिल्ह्यातील अंतर्गत रस्ते
संघटनेच्या कार्यकर्त्यांनी
बंद पाडलेत.
सांगली,
कोल्हापूर,
सातारा जिल्ह्यात
एसटी गाड्यांसह जवळपास 70
हून अधिक वाहनांची
तोडफोड करण्यात आलीय.
कराडमध्ये स्वाभिमानी
शेतकरी संघटनेनं आज आयोजित
केलेल्या सभेला हजारो शेतकरी
जमले होते.
सरकारचा निषेध
म्हणून यापैकी 200
शेतक-यांनी
मुंडण केलं.
सरकारची प्रेतयात्रा
काढून तेरावंही घालण्यात
आलं.. काले
इथे केंद्रीय कृषिमंत्री शरद
पवार, मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाण आणि
उपमुख्यमंत्री अजित पवार
यांच्या पुतळ्यांचं दहन
करण्यात आलं.
ऊसदर आंदोलन
पेटत असताना मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाण यांच्या
नेतृत्वाखाली सर्वपक्षीय
शिष्टमंडळानं मंगळवारी
पंतप्रधानांची भेट घेतली.
परंतु त्या
शिष्टमंडळाच्या हाती केवळ
समितीचं गु-हाळ
लागलं...
महाराष्ट्रासोबत
इतर राज्यांचा साखर प्रश्न
सोडवण्यासाठी पंतप्रधानांनी
केंद्रीय कृषीमंत्री शरद
पवार यांच्या अध्यक्षतेखाली
तीन सदस्यीय समिती नेमण्याची
घोषणा केलीय.
मात्र ही समिती
आधीपासूनच नेमण्यात आली
असल्याने मुख्यमंत्र्यांच्या
नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला
रिकाम्या हातीच परतावं लागलं.
राज्य आणि
केंद्र सरकार अशी टोलवाटोलवी
करत असल्यानं ऊस उत्पादक
शेतक-यांनी
आक्रमक पवित्रा घेतलाय...
कराडमध्ये बुधवारी
झालेल्या सभेत स्वाभिमानी
शेतकरी संघटनेचे नेते खासदार
राजू शेट्टी यांनी 48
तासांच्या कडकडीत
बंदची घोषणा केली...
(बाइट
- खा.
राजू शेट्टी)
गुरूवारी
सकाळपासून हा दोन दिवसांचा
बंद पुकारण्यात येणार आहे.
भाजीपाला आणि
दूधपुरवठा देखील रोखण्यात
येणार असल्यानं या बंदची झळ
मुंबईकरांना आणि पुणेकरांनाही
बसणार आहे...
निदान त्यामुळं
तरी शेतक-यांच्या
व्यथा सरकारला लवकर समजतील,
असा राजू शेट्टींचा
समज असावा. नाक
दाबल्याशिवाय तोंड उघडत
नाही.... आता
कडकडीत बंदमुळं तरी सरकार
ऊसदराचा निर्णय लवकर घेईल
का, हा
प्रश्नच आहे....
No comments:
Post a Comment