१२ डिसेंबर २०१३
अण्णा
हजारेंच्या आंदोलनाला 'आप'चा
ताप झालाय...
आपच्या नेत्यांनी
राळेगणमध्ये येऊन,
नव्या टीम अण्णामध्ये
सरकारी दलाल सहभागी असल्याची
आरोपांची राळ उठवली...
त्यामुळं नवी टीम
अण्णा अस्वस्थ झालीय.
त्यातच विश्वंभर
चौधरी यांनी राळेगण सोडल्याने
वातावरण आणखी तापलंय....
.....................
व्हिओ -
जनलोकपालसाठी
अण्णा हजारेंनी सुरू केलेल्या
बेमुदत उपोषणाचा तिसरा दिवस
विविध नाट्यमय घडामोडींमुळे
गाजला... अण्णांना
पाठिंबा देण्यासाठी आम आदमी
पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल
ताप असल्याने राळेगणला येऊ
शकले नाहीत..
परंतु त्यांनी
पाठवलेल्या कुमार विश्वास
आणि अन्य दोघा 'आप'च्या
सहका-यांनी
जी काही वक्तव्ये केली,
त्यामुळे अण्णा
हजारेंनाच नवा ताप झालाय...
आपच्या नेत्यांनी
अण्णांची भेट घेऊन त्यांच्या
उपस्थितीतच नव्या टीम अण्णा
सदस्यांवर नाव न घेता,
गंभीर आरोप केले...
अण्णांच्या आंदोलनात
पत्रकार रूपाने 'सरकारी
दलाल'
सहभागी झाले असल्याचा
खळबळजनक आरोप कुमार विश्वास
यांनी केला...
त्यांचा स्पष्ट
रोख अण्णांचे नवे सहकारी संतोष
भारती यांच्यावर होता...
(बाइट
- कुमार
विश्वास, नेते,
आप)
व्हिओ -
कुमार
विश्वास यांच्या या भडिमारामुळे
नवी टीम अण्णा अस्वस्थ झालीय...
त्यांच्या या आरोपाचा
संतोष भारती यांनीही परखड
शब्दांत समाचार घेतला.
(बाइट
- संतोष
भारती, अण्णांचे
नवे सहकारी)
व्हिओ -
दरम्यान,
आपल्या आंदोलनात
सरकारी दलाल सहभागी झाल्याच्या
आरोपांचे अण्णांनीच खंडन
केलंय...
(बाइट
- अण्णा
हजारे, सामाजिक
कार्यकर्ते)
व्हिओ -
त्यातच
उपोषणाला बसू नका,
असा सल्ला अण्णांनी
दिला असतानाही,
आपचे नेते गोपाळ
राय यांनी उपोषण सुरू करण्याचा
पवित्रा घेतलाय...
(बाइट
- गोपाळ
राय, नेते,
आप)
व्हिओ -
या घडामोडींमुळे
टीम अण्णामध्ये अस्वस्थता
पसरलीय... अण्णा
उपोषणाला बसलेले असताना,
दिल्लीमध्ये
सेलिब्रेशन करणा-या
आपसारख्या राजकीय नेत्यांना
राळेगणमध्ये थारा देऊ नये,
अशी भूमिका अण्णांच्या
सहका-यांनी
घेतली होती.
परंतु तरीही कुमार
विश्वास यांनी आंदोलनात
भाषणबाजी करण्याची संधी
देण्यात आल्याने अण्णांचे
सहकारी विश्वंभर चौधरी नाराज
झालेत. त्यातच
राळेगण सोडून ते निघून गेल्याने
नानाविध चर्चांना ऊत आलाय...
(बाइट
- विश्वंभर
चौधरी, फोनो
वापरणे)
व्हिओ -
या सगळ्या
नाट्यमय घडामोडी लक्षात घेता
हे आंदोलन नेमकं कोणाचं?
आंदोलन नेमकं
कशासाठी?
या उपोषणातून काय
साधलं जाणार?
असे सवाल निर्माण
झालेत. अण्णा
राहिले एका बाजूला,
जुनी टीम विरूद्ध
नवी टीम यांच्यात या भीष्म
पितामहाला स्वतःकडे खेचण्यासाठी
राळेगणच्या भूमीवर महाभारत
सुरू झालंय... त्यात
अण्णांची तब्येत आणखीय
खालावतेय...
No comments:
Post a Comment