Wednesday, October 1, 2014

जनलोकपालसाठी अण्णा हजारेंचे उपोषण

११ डिसेंबर २०१३
जनलोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीमध्ये आमरण उपोषण सुरू केलंय... मात्र या आंदोलनात सहभागी व्हायचं सोडून, अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पार्टीचे नेते सेलिब्रेशनमध्ये गुंग झाले होते... झी मीडियाने त्यांचे वाभाडे काढल्यानंतर आता केजरीवाल यांना जाग आलीय... अण्णांच्या भेटीसाठी ते आता राळेगणला जाणार आहेत...
.............

व्हिओ -
दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीचे 28 आमदार निवडून आल्यानं अरविंद केजरीवाल यांच्या डोक्यात बहुधा हवा गेलीय... इतकी की, जनलोकपाल विधेयकासाठी अण्णांनी राळेगणमध्ये उपोषण आंदोलन सुरू केलं असताना, केजरीवाल आणि कंपनी मात्र दिल्लीमध्ये सेलिब्रेशनच्या मूडमध्ये होती... अण्णांना पाठिंबा देणं राहिलं बाजूला, विजयाच्या उन्मादात केजरीवाल आणि आपचे नेते आपल्या गुरूलाच साफ विसरले.. विजयानंतर केजरीवालांनी आपले गुरू अण्णा हजारे यांना साधा फोनही केला नाही..

(बाइट - अण्णा हजारे - केजरीवालांचा फोनही आला नाही...)

व्हिओ -
भ्रष्टाचाराच्या विरोधात दोन वर्षांपूर्वी अण्णा हजारेंनी केलेल्या आंदोलनामुळे अवघा देश ढवळून निघाला... राजधानी दिल्लीतील सत्ताधारीही हादरून गेले. या लढ्याचे हिरो होते अण्णा हजारे, तर मास्टरमाईंड होते अरविंद केजरीवाल... अण्णांच्या त्याच आंदोलनाच्या जोरावर केजरीवाल यांनी स्वतःची पोळी भाजून घेतली. आम आदमी पार्टीचे 28 आमदार दिल्लीत विजयी झाले. परंतु ज्या गुरूमुळे हे यश मिळाले, त्याच गुरूला केजरीवाल विसरले... 'झी मीडिया'नं याबाबत विशेष कार्यक्रम सादर करून केजरीवालांच्या डोक्यात कशी हवा गेलीय, हे दाखवलं... राळेगणमध्ये अण्णा एकाकी झुंज देत असताना, केजरीवाल दिल्लीत सेलिब्रेशन करत असल्याचं वृत्त आम्ही सातत्यानं दाखवलं..

(बाइट - उदय सरांच्या चंकमधील बाइट व शॉट्स)

व्हिओ -
'झी मीडिया'च्या या दणक्यानंतर अखेर आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांना जाग आली. अण्णांना भेटण्यासाठी आपण राळेगणला जाणार असल्याचं केजरीवालांनी जाहीर केलंय. मात्र व्यासपीठावर न बसता, आपण लोकांमध्ये बसणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलंय...

(बाइट - अरविंद केजरीवाल - राळेगणला जाणार, या आशयाचा)

व्हिओ -
केजरीवालांना उशिरा का होईना, आता उपरती झालीय... केजरीवाल देर आए, दुरूस्त आए... परंतु केजरीवालांचेही पाय मातीचेच असल्याचं स्पष्ट झालंय... कारण बुंद से गयी, वो हौद से नही...


No comments:

Post a Comment