२६ नोव्हेंबर २०१३
सिंधुदुर्गात
शिवसैनिक विरूद्ध नारायण
राणे समर्थक असा राडा पेटला
असताना, शिवसेना
पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही
या आगीत तेल ओतलंय...
शिवसैनिकांवर
सुपारी घेऊन जबर लाठीमार
करणा-या
पोलिसांची आणि सत्ताधा-यांची
दादागिरी खपवून घेणार नाही,
असा दम उद्धव ठाकरेंनी
दिलाय. उद्धव
यांच्या आव्हानाला आता नारायण
राणे काय प्रत्युत्तर देतात,
याकडे सर्वांचं
लक्ष लागलंय...
(शिवसैनिकांना
पोलीस चोपत असल्याच्या शॉट्सने
पॅकेजची सुरूवात करावी...)
व्हिओ -
हा राडा सुरू आहे
सिधुदुर्गात...
गेल्या रविवारी
कणकवलीत शिवसैनिकांना पोलिसांनी
बेदम चोप दिला...
उद्योगमंत्री
नारायण राणे यांच्या विरोधात
आयोजित आमनेसामने कार्यक्रमासाठी
शिवसैनिक आणि राणे समर्थक
मोठ्या संख्येनं जमले होते.
त्यावेळची तणावग्रस्त
परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी
ऐनवेळी कार्यक्रम रद्द केला.
त्यामुळे संतप्त
झालेल्या शिवसैनिकांनी
जिल्हाप्रमुख वैभव नाईक
यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांवर
दगडफेक केली.
तेव्हा पोलीस
अधीक्षक अभिषेक त्रिमुखे
यांनी लाठीमाराचा आदेश दिला
आणि पोलिसांनी शिवसैनिकांना
अक्षरशः चोपून काढले.
शिवाय वैभव नाईक
यांच्यासह अनेक शिवसैनिकांना
अटक केली.
त्यामुळे सिंधुदुर्गातील
वातावरण चिघळले असून,
गेल्या दोन दिवसांपासून
कणकवलीमध्ये बंदसदृश तणाव
आहे.
या
पार्श्वभूमीवर शिवसेना
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी
आज स्वतः कणकवलीत जाऊन जखमी
शिवसैनिकांची विचारपूस केली.
हॉस्पिटलमध्ये
उपचार घेत असलेल्या जखमी
शिवसैनिकांना भेटून उद्धव
यांनी त्यांना धीर दिला.
उद्धव यांच्यासोबत
शिवसेना नेत्यांचा ताफाही
होता. त्यानंतर
कणकवलीत झालेल्या छोटेखानी
सभेत आणि पत्रकार परिषदेत
उद्धव यांनी नारायण राणे आणि
सरकारवर जोरदार प्रहार केले...
नारायण राणेंची
सुपारी घेऊन शिवसैनिकांना
मारहाण करणा-या
एसपी त्रिमुखे यांची बदली
करा, अशी
मागणी उद्धव ठाकरे यांनी
केलीय.
(बाइट
- उद्धव
ठाकरे)
व्हिओ -
एवढेच नव्हे तर
नारायण राणे यांच्यासह
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,
गृहमंत्री आर.
आर.
पाटील आणि राष्ट्रवादीचे
अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही
उद्धव यांनी जोरदार टीकास्त्र
सोडलं...
(बाइट
- उद्धव
ठाकरे)
व्हिओ
-
सिंधुदुर्गात
नारायण राणे विरूद्ध शिवसैनिक
असे राडे काही नवे नाहीत...
यापूर्वी परशुराम
उपरकर शिवसेनेत असताना,
शिवसैनिकांनी
वेंगुर्ल्यामध्ये राणेंचे
पुत्र नितेश राणे यांना पक्ष
कार्यालयात कोंडून ठेवले
होते. त्यावेळीही
पोलिसांनी शिवसैनिकांना
चोपले होते.
परंतु उद्धव ठाकरे
तेव्हा मात्र सिंधुदुर्गात
गेले नव्हते.
परंतु रविवारच्या
राड्यानंतर मात्र उद्धव ठाकरे
फौजफाट्यासह राणेंच्या
बालेकिल्ल्यात कणकवलीत दाखल
झाले. निवडणुकांच्या
तोंडावर नारायण राणे यांच्या
विरोधात वातावरण तापवण्यासाठी
शिवसेना नेतृत्व या राड्याचे
भांडवल तर करत नाही ना,
अशी शंका यानिमित्ताने
निर्माण झालीय...
झी
मीडिया, मुंबई
(पीटूसी)
No comments:
Post a Comment