४ डिसेंबर २०१३
उद्धव
ठाकरेंना माफीनामा लिहून
देणारे शिवसेना नेते डॉक्टर
मनोहर जोशी यांना पुन्हा एकदा
राज्यसभा खासदारकीचे वेध
लागलेत... जोशींनी
मंगळवारी नरेंद्र मोदींची
भेट घेऊन केलेलं जुगाड हा
त्यासाठीचा बोलका पुरावा
आहे....
.............
GFX IN
आधी शरद
पवारांशी दिल्लीत गुफ्तगू...
नंतर
'मातोश्री'वर
उद्धव ठाकरेंपुढे लोटांगण....
आणि आता
थेट गुजरातमध्ये नरेंद्र
मोदींशी सलोखा...
मनोहरपंतांचं
चाललंय तरी काय ?
GFX OUT
याआधी
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा
मतदारसंघासाठी हट्ट धरणा-या
मनोहरपंतांनी आता आपला मोर्चा
राज्यसभेकडे वळवलाय...
जोशी असल्यानं
बहुधा त्यांनी काळाची पावलं
आधीच ओळखली
असावीत... राहुल
शेवाळेंच्या दावेदारीमुळे
त्यांनी दक्षिण मध्य मुंबई
लोकसभा मतदारसंघाचा नाद
सोडला... सध्या
राज्यसभेच्या सातव्या जागेसाठी
त्यांची जुळवाजळव सुरुय...
त्यासाठी सर्वात
आधी त्यांनी दिल्लीत
शरद पवारांना गाठलं...
पवार-जोशी
भेटीला अवघे 24
तासही उलटत नाहीत
तोवर दादरमधील त्यांची प्रकट
मुलाखत वादळी ठरली...
नंतरचा इतिहास
सगळ्यांनाच ठाऊक आहे...
उद्धव ठाकरेंच्या
नेतृत्त्वाबाबतीत व्यक्त
केलेल्या मतांवर 360
अंशात कोलांटीउडी
मारत जोशींनी
गेल्या आठवड्यात उद्धव
ठाकरेंपुढे सपशेल शरणागती
पत्करली... सुरुवातीला
माफी मागण्यास राजी नसलेल्या
जोशींनी राज्यसभेसाठी चक्क
लेखी माफीनामा दिला...
पंत इतके धूर्त की
एकीकडे शिवसेनेचे माजी खासदार
मोहन रावलेंच्या बंडाच्या
वातावरणातच, त्यांनी
मंगळवारी गुजरातमध्ये जाऊन
नरेंद्र मोदींची भेट घेतली...
कुणालाही
विश्वासात न घेता पवारांना
भेटणा-या
पंतांनी यावेळी मात्र उद्धव
यांना मोदींच्या भेटीची कल्पना
देणं आपल्या फायद्याचं मानलं...
GFX IN
फेब्रुवारी
2014 मध्ये
महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या
सात जागांसाठी निवडणूक होतेय..
या निवडणूकीत
कॉँग्रेस- राष्ट्रवादी
कॉँग्रेसचे मिळून चार खासदार
सहज निवडून येतील...शिवसेना-भाजपचा
प्रत्येकी एक खासदार निवडून
येऊ शकतो. निवडून
येण्यासाठी पहिल्या पसंतीचा
37 मतांचा
कोटा आहे. त्यामुळे
सहा उमेदवार सहज निवडून
आल्यानंतर सातव्या जागेसाठी
चुरस असेल. सर्व
राजकीय पक्षांना मान्य होईल
अशा उमेदवाराची या
जागेसाठी चलती असेल..
सहज निवडून येणारी
शिवसेनेची जागा पंतांना मिळणं
कठीण असल्यानं त्यांनी सातव्या
जागेसाठी मोर्चेबांधणी सुरु
केल्याचं बोललं जातंय... शिवसेना-भाजप
आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसची
शिल्लक मतं मिळवण्याचा खटाटोप
त्यांनी सुरू केलाय..
तर मनसेची
12 ही मतं
आपल्याला मिळतील असा पंतांना
विश्वास आहे...
GFX OUT
कॉँग्रेसक़डे
अतिरिक्त मतं असली तरी ती
पंतांना मिळतीलच असे नाही...आपण
राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल
केल्यास शरद पवार ही निवडणूक
बिनविरोध करतील असाही पंतांचा
आशावाद आहे. शिवाय
मोदींनी पाठिंबा दिल्यास
राज्यसभेची स्वप्नं पाहाणारे
उद्योगपतीही जोशींच्या मार्गात
अडथळे निर्माण करण्याची शक्यता
कमी आहे. रिपाईचे
अध्यक्ष रामदास आठवलेंना
शिवसेनेनं राज्यसभेसाठी आधीच
स्पष्ट नकार कळवलाय...अन्य
राज्यातून भाजपच्या कोट्यातून
आठवलेंना राज्यसभेवर पाठवण्यासाठी
शिवसेना प्रयत्न करणार आहे.
त्यामुळे जोशींसाठी
सध्या तरी वातावरण अनुकूल
आहे. जोशींचा आधी
लोटांगण आणि आता राज्यसभेचं
पटांगण हा फॉर्म्युला एकदम
फिट आहे. पण तो हिट
होणार का, हे येत्या
फेब्रुवारीतच कळेल...
झी
मीडिया, मुंबई
No comments:
Post a Comment