Wednesday, October 1, 2014

आम आदमी पार्टीला अखेर अण्णांची आठवण

१२ डिसेंबर २०१३
तब्बल तीन दिवसानंतर अखेर आम आदमी पार्टीला अण्णा हजारेंची आठवण झालीय... अरविंद केजरीवाल हे स्वतः तापाने फणफणत असल्याने उपोषणाला बसलेल्या अण्णांच्या भेटीसाठी आले नाहीत. परंतु आम आदमी पार्टीच्या वतीने तिघा नेत्यांनी आज राळेगणमध्ये अण्णांची भेट घेऊन आपला पाठिंबा जाहीर केला...
................

(केजरीवाल यांच्या कालच्या सभेतील बाइटने पॅकेजची सुरूवात करावी.. अण्णांना भेटायला जाणार...)

व्हिओ - अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील सेलिब्रेशनच्या माहौलमध्ये ही घोषणा केली... जनलोकपाल कायद्यासाठी अण्णा आमरण उपोषणाला बसले असताना, अरविंद केजरीवाल दिल्लीमध्ये विजयाचं सेलिब्रेशन करत होतं. त्यावरून मोठी टीका झाल्यानंतर, अण्णांच्या भेटीला जात असल्याची घोषणा त्यांना करावी लागली... परंतु रात्रीच्या रात्रीत त्यांची तब्येत अचानक बिघडली. केजरीवालांना फणफणून ताप आल्यानं ते अण्णांच्या भेटीचं आश्वासन पाळू शकले नाहीत...

(बाइट - कुमार विश्वास, केजरीवालांना ताप आलाय, अशा आशयाचा)

व्हिओ -
केजरीवाल स्वतः आले नाहीत, मात्र आम आदमी पार्टीच्या वतीने कुमार विश्वास, संजय सिंग व गोपाळ राय यांना त्यांनी राळेगणला पाठवून दिलं.. कुमार विश्वास व त्यांच्या सहका-यांनी राळेगणमध्ये येऊन अण्णांवर स्तुतीसुमनं उधळली...

(बाइट - कुमार विश्वास, अण्णा आमच्या हृदयात आहेत, आंदोलनाला पाठिंबा अशा आशयाचा)

व्हिओ -
एवढंच नव्हे तर कुमार विश्वास यांनी अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांची फोनवरून बातचीतही घडवून आणली.

(बाइट - कुमार विश्वास, अण्णा आणि केजरीवाल यांच्यात बातचीत झाल्याबाबतचा)

व्हिओ -
जलसंपदा खात्यातला भ्रष्टाचार बाहेर काढणारे निवृत्त मुख्य अभियंता व आम आदमी पार्टीचे नेते विजय पांढरे, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनीही अण्णांची भेट घेतली. लोकपाल न आणणं ही सर्वच पक्षांसाठी आत्महत्या ठरेल असं त्या म्हणाल्या.
(बाइट - मेधा पाटकर, सामाजिक कार्यकर्त्या)

व्हिओ -
मुंबईतल्या डबेवाल्यांनीही अण्णांच्या उपोषणाला पाठिंबा जाहीर केलाय. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या अण्णांचं वजन दीड किलोनं घटलंय... अण्णांचं वजन घटलं असलं तरी आंदोलन पुन्हा एकदा जोर धरू लागलंय... पुढच्या काही दिवसांत हे राळेगणमधल्या आंदोलनाचे हादरे दिल्लीतील संसदेत जाणवू लागले, तर आश्चर्य वाटायला नको...


No comments:

Post a Comment