Wednesday, October 1, 2014

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नाराजी

९ डिसेंबर २०१३
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात थंडी हुडहुडी भरवत असताना, राजकीय वातावरण तापू लागलंय... मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या खुर्चीखाली काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनीच बॉम्ब लावायला सुरूवात केलीय... मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील नाराजी वाढत असून, काँग्रेस संघटनेसोबतच सरकारच्या नेतृत्वातही बदल करण्याची मागणी जोर धरू लागलीय...

व्हिओ -
यंदाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना टार्गेट करण्याची व्यूहरचना विरोधी पक्षानं आखलीय... परंतु विरोधकांआधी स्वपक्षीय आमदारांनीच मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर दिलाय.. पृथ्वीराज चव्हाण निर्णय घेत नाहीत, अशी तक्रार काँग्रेसचे अनेक आमदार खासगीत करत असतात. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्रीपदी राहिले तर राज्यात काँग्रेसला निवडणुका जिंकणं अवघड जाईल, अशी टोकाची भूमिकाही काँग्रेसच्या काही आमदारांनी घेतली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांना कसेबसे शांत केले होते. आता हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री बदलाच्या मागणीनं पुन्हा एकदा उचल खाल्लीय...

नागपूरात थंडीबरोबरच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या आमदारांच्या मनातला असंतोषही वाढत चाललाय. मुख्यमंत्र्यांच्या निर्णय क्षमतेवर प्रश्नचिन्हं निर्माण करणा-या आमदारांनी आता थेट राजीनाम्याचे अस्त्र उगारलंय. पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील अनधिकृत बांधकामावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार आमदारांनी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे राजीनामे दिलेत. त्यात विलास लांडे, बापूसाहेब पठारे, लक्ष्मण जगताप आणि अण्णा बनसोडे यांचा समावेश आहे. मागील तीन वर्षांपासून पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील अऩधिकृत बांधकामांबाबत सरकारने निर्णय घ्यावा यासाठी हे आमदार मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा करत आहेत. दुसरीकडे मुंबईतील काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदारही मुख्यमंत्र्यांवर नाराज आहेत. मुंबईतील 2000 पर्यंतच्या झोपड्या अधिकृत करा आणि जुन्या आणि अऩधिकृत इमारतींचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी हे आमदार नागपुरात बैठक घेणार आहेत.

बाईट - नबाव मलिक, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस (Nagpaur Adhiveshn Byte )

दरम्यान, चार राज्यातील पराभवानंतर काँग्रेसने आत्मचिंतन सुरू केलेय. त्यादृष्टीनं काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक उद्या दिल्लीत होतेय. झालेल्या चुका सुधारण्यासाठी या बैठकीत मोठे फेरबदल होण्याची चिन्हे आहेत. काही प्रस्थापितांना बाजूला सारून, तरुणांना मोठ्या प्रमाणावर संधी मिळण्याची शक्यताही व्यक्त केली जातेय.

बाईट - राजीव सातव, राष्ट्रीय अध्यक्ष, युवक काँग्रेस

व्हिओ -
नाराज आमदारांना शांत करताना, मुख्यमंत्र्यांच्या राजकीय हुशारीचा कस लागणार आहे. विरोधकांच्या तोफगोळ्याचा सामना करताना, स्वपक्षीयांच्या मा-याला मुख्यमंत्री कसे तोंड देतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलंय...

No comments:

Post a Comment