२ डिसेंबर २०१३
शिवसेना
पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची
पक्षावरील पकड जेवढी वाढतेय,
तेवढीच शिवसेनेतील
नाराजीही वाढत चाललीय...
उद्धव ठाकरे आणि त्यांचे
पीए मिलिंद नावर्केर यांच्याविरोधात
तोफ डागणारे माजी खासदार मोहन
रावले यांच्यावर हकालपट्टीची
कारवाई करण्यात आलीय...
शिवसेना हा पक्ष
नाराजांची सेना बनतोय...
पाहूया एक खास रिपोर्ट...
................
(मला
अस्तनीतले निखारे नकोत...
ज्यांना पक्ष सोडून
जायचेय त्यांनी खुशाल जावं,
या उद्धव ठाकरेंच्या
बाइटनं सुरूवात करावी...)
व्हिओ
- उद्धव ठाकरेंचा
हा परखड इशारा आल्यानंतर मनोहर
जोशींनी सपशेल लोटांगण घालत,
माफीनामा लिहून दिला...
अस्तनीतला एक निखारा
विझला... परंतु दुसरा
निखारा आणखीच तापला...
मनोहरपंतांनी बंडाची
तलवार म्यान केली, परंतु
लालबाग-परळच्या
बालेकिल्ल्यातून लागोपाठ
पाचवेळा खासदार झालेल्या
मोहन रावलेंनी बंडाचं निशाण
फडकतं ठेवलं...
(बाइट
- मोहन
रावले, शिवसेना
दलालांचा पक्ष वगैरे)
व्हिओ
-
रावलेंनी
उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर
यांच्यावर आपल्या धनुष्यातून
जहरी टीकेचे 'बाण'
सोडल्यानंतर त्यांची
पत्रकार परिषद संपण्याआधीच,
त्यांची शिवसेनेतून
तडकाफडकी हकालपट्टी करण्यात
आली...
GFX IN
एकेकाळी
बाळासाहेब ठाकरेंचे बॉडीगार्ड
असलेल्या मोहन रावले दक्षिण
मध्य मुंबईतून पाचवेळा खासदार
म्हणून निवडून आले.
परंतु खासदार
या नात्यानं रावलेंनी
शिवसेनेसाठी आणि मतदारसंघासाठी
काय केलं, हा
मोठा प्रश्नच आहे...
गिरणी कामगाराचा
मुलगा असलेले रावले 1991 मध्ये
पहिल्यांदा खासदार बनले आणि
पहिल्याच टर्ममध्ये त्यांनी
नाराजी ओढवून घेतली.
तत्कालिन पंतप्रधान
नरसिंह राव यांच्यावरील
अविश्वास ठरावाच्या वेळी
रावले मतदानासाठी गैरहजर
राहिले आणि अवघ्या एका मताने
नरसिंह राव सरकार वाचले..
त्यावेळी शिवसैनिकांच्या
रोषातून वाचण्यासाठी रावलेंनी
कुख्यात गुंड अरूण गवळीची
मदत घेतली होती....
गेल्या लोकसभा
निवडणुकीत दक्षिण मुंबईतून
पराभूत झाल्यानंतर मोहन
रावलेंचा शिवसेनेशी फारसा
संबंधच उरला नव्हता..
GFX OUT
(बाइट
- अरविंद
सावंत, शिवसेना
नेते)
व्हिओ
-
अलिकडेच
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे
यांची भेट घेतल्यानंतर रावले
पुन्हा प्रकाशझोतात आले...
रावले शिवसेनेत
अस्वस्थ होतेच.
त्यातच दक्षिण
मुंबईतून शिवसेनेने अरविंद
सावंत यांना तिकीट देण्याचे
संकेत दिले.. त्यामुळेच
रावलेंच्या संतापाचा
स्फोट झाल्याचं सांगितले
जातेय.. मात्र
जाता जाता बाळासाहेब
ठाकरेंच्या स्मारकाचा मुद्दा
उपस्थित करून आणि मिलिंद
नार्वेकरांवर बाळासाहेब कसे
नाराज होते, याचा
किस्सा सांगून रावलेंनी
सेनेत चलबिचल
निर्माण केलीय...
गेल्या काही
दिवसांपासून शिवसेना हा पक्षच
'नाराजांची
सेना' बनलाय..
गजानन कीर्तीकर,
रामदास कदम,
संजय राऊत हे नेते
खासगीत नाराजी व्यक्त करत
असताना, आधी
जोशीसर आणि आता
मोहन रावलेंनी बंडाचं उघड
निशाण फडकवलं...
जोशीसरांकडून
माफीनामा घेतल्यानंतर त्यांना
जीवदान देण्यात आलं...
याउलट मोहन रावलेंना
मात्र थेट नारळ देण्यात आला...
निवडणुकांच्या
तोंडावर शिवसेनेतली ही बंडाळी
पक्षाला भोवणार,
एवढं नक्की....
ब्युरो रिपोर्ट,
झी मीडिया
No comments:
Post a Comment