Wednesday, October 1, 2014

महाराष्ट्रातील 'खेमका' सुनील केंद्रेकर

२८ नोव्हेंबर २०१३
बीडचे जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांच्या बदलीमुळे बीडमध्ये संतापाचे वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावामुळे झालेली केंद्रेकरांची बदली रोखण्यासाठी नागरिकांनी 'बीड बंद'चा इशारा दिलाय. महाराष्ट्रातील 'खेमका' बनलेल्या केंद्रेकरांच्या बदलीवरून राजकीय नेत्यांनीही एकमेंकावर दुगाण्या झाडायला सुरूवात केली.
................

व्हिओ -

अवघ्या 17 महिन्यांच्या कालावधीमध्ये 'कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकारी' असा नावलौकिक कमावणारे बीडचे जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांची बदली झाली आणि बीडकरांच्या संतापाचा उद्रेक झालाय... औरंगाबाद सिडकोचे मुख्य प्रशासक म्हणून त्यांची बदली करण्यात आलीय... तर त्यांच्या जागी नवलकिशोर राम हे नवे जिल्हाधिकारी म्हणून बीडला रुजू होणार आहेत... राजकीय परिणामांची पर्वा न करता केंद्रेकरांनी भ्रष्टाचार, अनधिकृत बांधकामं, अनधिकृत वाळू उपसा, रेशनिंगचा काळाबाजार याविरोधात धडाकेबाज कामगिरी बजावली... त्यामुळं जनतेच्या नजरेत ते बीडचे 'सिंघम' झाले, पण स्थानिक राजकारणी दुखावले गेले... राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जयदत्त क्षीरसागर, राज्यमंत्री सुरेश धस, आमदार विनायक मेटे आणि अमरसिंह पंडित यांच्या दबावामुळेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रेकरांची बदली केल्याचं बोललं जातंय...

(बाइट - गोपीनाथ मुंडे)

व्हिओ -
मात्र या बदलीशी आपला काहीच संबंध नसल्याचा खुलासा महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांनी केलाय...

(बाइट - सुरेश धस, राज्यमंत्री)

व्हिओ -
तर केंद्रेकर यांच्या विनंतीवरूनच त्यांची बदली करण्यात आल्याचा दावा करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सारवासारव चालवलीय...

(बाइट - अजित पवार, उपमुख्यमंत्री)

व्हिओ -
परंतु अशाप्रकारची कोणतीही विनंती केंद्रेकरांनी सरकारला केलेली नव्हती... उलट सरकारनेच तुमची बदली करायची का, अशी विचारणा केंद्रेकरांकडे केल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी दिलीय... केंद्रेकरांची बदली झाल्यामुळे बीडमधील नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झालाय. बदली रोखण्यासाटी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे 'बीड बंद'चं आवाहन केलंय...

(बाइट - नागरिकांचे बाइट्स)

व्हिओ -
बदल्यांचा कायदा केला, तरीही राजकीय दबावापोटी बदल्या होत असल्याचे ढळढळीत उदाहरण केंद्रेकरांच्या निमित्ताने पुढे आलंय... कर्तव्यदक्ष अधिका-यांचे खच्चीकरण करण्याचा हा राजकीय कट कधी तरी थांबणार का? असा प्रश्न बीडच्या नव्हे, तर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला पडलाय...


No comments:

Post a Comment