Wednesday, October 1, 2014

अण्णांचे आंदोलन आणि अरविंद केजरीवाल

११ डिसेंबर २०१३
(अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांच्या एकत्र शॉट्सने पॅकेजची सुरूवात करावी...)
व्हिओ -
भ्रष्टाचाराच्या विरोधात दोन वर्षांपूर्वी अण्णा हजारेंनी केलेल्या आंदोलनाने सारा देश ढवळून निघाला... राजधानी दिल्लीतील सत्ताधारी हादरून गेले, या अभूतपूर्व, ऐतिहासिक आंदोलनाने तरूणाईला नवी दिशा दिली... जनलोकपाल कायद्यासाठी सुरू केलेल्या या लढाईत अण्णा हजारे हिरो होते, तर अरविंद केजरीवाल हे या आंदोलनाचा मास्टरमाईंड होते...
परंतु आता गेल्या दोन वर्षांत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय... जनलोकपाल आंदोलनाच्या निमित्तानं अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांची झालेली युती आता तुटलीय... आम आदमी पार्टी या राजकीय पक्षाची स्थापना करण्यावरून अण्णा आणि केजरीवाल यांच्यात मतभेद निर्माण झालेत.. अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या जीवावर आम आदमी पार्टीला दिल्लीतील निवडणुकीत जोरदार यश मिळाले, पहिल्याच फटक्यात आपचे 28 आमदार निवडून आले.. या यशाची हवा आता बहुतेक केजरीवाल आणि कंपनीच्या डोक्यात गेलीय...
कारण जनलोकपाल विधेयक संसदेत संमत करण्याचं पंतप्रधानांचं आश्वासन अजून कागदावरच आहे... त्यामुळं जनलोकपाल कायद्यासाठी अण्णांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय... राळेगणसिद्धीमध्ये त्यांनी करो या मरोचा निर्धार करत, बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केलंय... अण्णांची वन मॅन आर्मी लढा देतेय... एकीकडे अण्णा प्राणांची बाजी लावली असताना, दुसरीकडे आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी त्यांना साधा फोनही केलेला नाही.
(बाइट - अण्णा हजारे)
केजरीवालांनी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी अण्णा हजारेंचा वापर केला... अण्णांना शहीद करण्याचा केजरीवालांचा डाव होता, असा सनसनाटी गौप्यस्फोट मध्यंतरी स्वामी अग्निवेश यांनी केला होता...
(बाइट - स्वामी अग्निवेश)
स्वामी अग्निवेश यांचा आरोप खरा होता की काय, अशी शंका आता येऊ लागलीय... कारण एकीकडे अण्णांनी प्राणांची बाजी लावली असताना, केजरीवाल आणि कंपनी मात्र विजयाच्या सेलिब्रेशनमध्ये मश्गूल आहेत. दिल्लीतील विजयानंतर केजरीवालांच्या डोक्यात हवा गेलेली दिसतेय... म्हणूनच तर उपोषण सुरू असतानाही, जल्लोष आणि सेलिब्रेशन करण्याचा मोह केजरीवालांना टाळता आलेला नाही...
अण्णांचा वापर करून मोठे झालेल्या केजरीवालांना आता आपल्या गुरूचा चक्क विसर पडलाय... त्यामुळेच तर 'गरज सरो आणि वैद्य मरो' या म्हणीची प्रकर्षाने आठवण येतेय...


No comments:

Post a Comment