Wednesday, October 1, 2014

बिर्ला क्रीडा केंद्र ठक्कर कॅटरर्सला आंदण

१० डिसेंबर २०१३
गिरगाव चौपाटीवरील मुंबई महापालिकेचं बिर्ला क्रीडा केंद्र आता ओळखलं जातंय ते ठक्कर्स कॅटरर्सच्या नावानं. मार्केट रेटच्या तुलनेत अगदीच तुटपुंज्या भाड्यावर बीएमसीनं हे केंद्र जणू ठक्कर्स कॅटरर्सला आंदण दिलंय... 10 वर्षांचा भाडेकरार संपून एक वर्ष झालं असलं तरी बीएमसीनं साधी नोटीस पाठवण्याचीही तसदी घेतलेली नाही.

व्हीओ.1-
बिर्ला क्रीडा केंद्राच्या इमारतीबाहेर बीएमसीचं आणि बिर्लांचं नाव दिसत असलं तरी आतला सर्व कारभार मात्र ठक्कर्स कॅटरर्सच्या हातात आहे. क्रीडा क्रेंद्राची ओळख कधीच संपली असून आतमध्ये चालतात केवळ उच्चभ्रूंच्या पार्ट्या आणि लग्नसमारंभ.... मुंबई महापालिकेच्या कृपेनं हे सारं आलबेल सुरु आहे. बंद अवस्थेत असलेल्या बिर्ला क्रीडा केंद्राचं कॅन्टीन बीएमसीनं ठक्कर्स कॅटरर्सला दहा वर्षांच्या करारावर भाड्यानं दिलं. या करारातील सर्व तरतुदी ठक्कर्सला फायदेशीर अशाच आहेत.
GFX IN...
7049 स्क्वेअर फूट क्षेत्रफळ असणारं कॅन्टीन दरमहा 1 लाख 80 हजार रुपये भाडेतत्वावर देण्यात आलं. म्हणजे केवळ 25 रुपये प्रति स्क्वेअर फूट दर. गेल्या वर्षभरापासून 62 रुपये प्रति स्क्वेअर फूट दर आकारला जात असला तरी गिरगाव भागात मार्केट रेट आहे सरासरी 250 रुपये प्रति स्क्वेअर फूट... मार्केट रेटनुसार भाडे आकारल्यास दरमहा 17 लाख 50 हजार रुपये बीएमसी तिजोरीत जमा होऊ शकतात.
GFX OUT
परंतु बीएमसी अशा फायद्याच्या गोष्टी करणार नाही. सुमारे 21 हजार स्क्वेअर फुटांचा लॉनही ठक्कर्स कॅटरर्स आपल्या गरजेनुसार वापरतो. म्हणजे सात तासांसाठी तो बीएमसीला देतो केवळ वीस हजार रुपये. तर ठक्कर्स त्याच लॉनसाठी ग्राहकांकडून वसूल करतो 2 ते 3 लाख रुपये.. दहा वर्षांचा करार संपल्यानंतरही पुढील काळासाठी ही जागा ठक्कर्सकडेच कशी राहिल याचीही तरतूद या करारात करण्यात आलीय.     

बाईट - चेतन मदन, कार्यकर्ता मनसे

व्हीओ.2 - जनतेला दाखवण्यासाठी बिर्ला क्रीडा केंद्र दुरुस्तीच्या नावाखाली तेरा वर्षांपासून बंद ठेवण्यात आलंय... परंतु ठक्कर्स कॅटरर्सला वापरासाठी मात्र ते खुलं आहे. सत्ताधारी आणि अधिका-यांशी असलेल्या अर्थपूर्ण संबंधामुळेच ठक्कर्सवर एवढी मेहेरबानी केली जात असल्याचा आरोप मनसेनं केलाय.

बाईट - अरविंद गावडे, विभागप्रमुख, मनसे       
      - सुरेंद्र बागलकर, नगरसेवक, शिवसेना

व्हीओ.3-  ठक्कर्स कॅटरर्सला पार्ट्या करण्यासाठी आणि रेस्टॉरंट चालवण्यासाठी बिर्ला कुटुंबियांनी ही जागा बीएमसीला दिली नव्हती. तर नाट्य संस्कृती वाढीसाठी दिली होती. याची आठवण मुंबई महापालिकेत सत्ता गाजवणा-या शिवसेनेला कधी येणार?

No comments:

Post a Comment