Wednesday, October 1, 2014

आरूषी तलवार डबल मर्डर गूढ

२५ नोव्हेंबर २०१३
नोएडा येथील आरूषी तलवार या 14 वर्षीय मुलीच्या आणि नोकराच्या हत्येचे गूढ अखेर साडे पाच वर्षानंतर उकललंय... आरूषीचे पिता डॉ. राजेश तलवार आणि आई नुपूर तलवार यांनीच आरूषी व हेमराज नावाच्या नोकराचा डबल मर्डर केल्याचं सिद्ध झालंय...
..................

व्हिओ -
ज्या मुलीला तळहाताच्या फोडासारखी वाढवली, तिचीच निर्घृण हत्या आईवडिल करू शकतात का..? ज्या मुलीला मायेनं वाढवलं, तिचाच गळा चिरण्याचे कृत्य आईवडिल करू शकतात का..? दुर्दैवाने आयुषी तलवार या मुलीच्या खून प्रकरणात या प्रश्नांची उत्तरं होय अशीच आढळलीत... गाझियाबादच्या विशेष सीबीआय कोर्टानं डेंटिस्ट डॉ. राजेश तलवार आणि नुपूर तलवार या उच्चशिक्षीत दाम्पत्याला दोषी ठरवलं...

(बाइट - वकिलांचे बाइट)

व्हिओ -
16 मे 2008 रोजी नोएडा येथील जलवायू विहार भागात राहणारे ख्यातनाम डॉक्टर राजेश तलवार यांच्या 14 वर्षीय मुलीची आरूषीची हत्या करण्यात आली. डॉक्टर ऑपरेशनसाठी वापरतात, त्या धारदार चाकूने बेडरूममध्येच आरूषीचा गळा चिरण्यात आला होता. घरातला नेपाळी नोकर हेमराज बंजाडे गायब असल्यानं त्यानंच ही हत्या केली असावी, असा संशय होता. परंतु दुस-याच दिवशी 17 मे रोजी घराच्याच टेरेसवरील टाकीमध्ये हेमराजचा मृतदेह आढळला आणि या प्रकरणाला गंभीर वळण लागले...

त्यानंतर गेली पाच वर्षे आरूषी-हेमराज हत्याकांडाने खळबळ उडवून दिली होती. डबल मर्डरप्रकरणी डॉ. राजेश आणि नुपूर तलवार दाम्पत्याला झालेली अटक, तलवार दाम्पत्यावर पुरावे नष्ट केल्याचा आरोप, साक्षीदारांनी बदललेल्या जबानी, या प्रकरणाचा तपास करणा-या पोलीस अधिका-यांच्या बदल्या, सीबीआयकडे सोपवलेला तपास, तपासाला दिशा मिळत नसल्यानं सीबीआयनं दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट, आईवडिलांची जामिनावर सुटका आणि सीबीआय कोर्टात चाललेला खटला अशा घटनाक्रमांमुळे आरूषी हत्याकांडाचे गूढ दिवसागणिक वाढतच चालले होते. मात्र अखेर सीबीआय कोर्टाने आरूषीच्या आणि नोकर हेमराजच्या खुनाप्रकरणी तलवार दाम्पत्यालाच दोषी ठरवले... आपली मुलगी आरूषी आणि नोकर हेमराज यांना अश्लील चाळे करताना तलवार दाम्पत्याने पाहिले. त्याचा राग अनावर होऊन, तलवार दाम्पत्याने आरूषी व हेमराजची सर्जिकल चाकूने गळा चिरून हत्या केली, हे आता निकालाअंती स्पष्ट झालंय...

दोषी तलवार दाम्पत्याची रवानगी आता दासना जेलमध्ये करण्यात आलीय. परंतु त्यांच्याविरूद्ध खोटेनाटे पुरावे गोळा करण्यात आल्याची टीका तलवार कुटुंबियांनी केलीय...

(बाइट - रिबेका जॉन, तलवार दाम्पत्याची वकिल)

व्हिओ -
पांढरपेशा वर्गातील ऑनर किलिंगचा हा प्रकार धक्कादायकच म्हणायला हवा... त्याचबरोबर तपास यंत्रणांच्या गलथान कारभाराचा नमुना म्हणूनही आयुषी-हेमराज हत्या प्रकरणाकडे पाहायला हवं...


ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया

No comments:

Post a Comment